चिंचोली येथील शेकाप कार्यकर्त्यांचा आ.शहाजीबापूंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

सांगोला :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेतील सांगोला तालुक्यातील पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेनेकडे तरुणांचा कल वाढत असून तरुणांची फळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे.सांगोला तालुक्यातील चिंचोली गावातील शेकापच्या सुमारे ३० युवा कार्यकर्त्यांनी शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी आ.शहाजीबापू यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आ.शहाजीबापूंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश करुन आ.शहाजीबापू यांना समर्थ साथ देऊ व या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजीबापू यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करु,असे आश्वासन यावेळी दिले.

शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या व सतर्क राहून जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याविषयी आवाहन केले.या पक्षप्रवेशावेळी माजी पं.स.सदस्य सुभाष इंगोले, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील,दादासाहेब वाघमोडे सर, आनंदकाका घोंगडे, युवा सेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे,युवा सेना शहरप्रमुख समीर पाटील यांच्यासह इतर मान्यवर,शिवसेना व युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला तालुक्यातील चिंचोली गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी आम.शहाजीबापू यांच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्रित येऊन आमदार शहाजीबापू यांना विधानसभा निवडणुकीत मोलाची साथ देण्यासाठी व आमदार करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुणांमध्ये शिवाजी सरगर,सागर पारसे,सुरज पारसे,विपुल पारसे,कुमार सूर्यगण, आशिष खंडागळे,सुजित करडे,विशाल बनसोडे, ओंकार ऐवळे,रवी ऐवळे,अजय शेख,कबीर शेख, आकाश भोसले,अजय भोसले,साहिल भजनावळे, संजय इंगोले,पंकज ऐवळे,विकास पारसे,साहिल पारसे,हरी ऐवळे,बळीराम ऐवळे,काशिलिंग ऐवळे,सुरेश कांबळे,सोमनाथ हेगडे,गोपीनाथ गोरे,आदित्य ऐवळे, किरण सरगर,दत्ता काळे,स्वप्नील पारसे या तरुण कार्यकर्त्यांनी आ.शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करुन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.ऐन निवडणुकीच्या तोंडावर तरुण कार्यकर्त्यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश हा बापूंसाठी जमेची बाजू ठरणार आहे.
——————————————————————————