सांगोला तालुक्यात हरितक्रांती घडविण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे,यातच खरा आनंद आहे – आम.शहाजीबापू पाटील

 

सांगोला :

सांगोला तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी मी माझे आयुष्य पणाला लावले.१९९०
पासून तालुक्याच्या राजकारणात अनेक चढउतार पाहिले.७ वेळा विधानसभा निवडणूक लढविली. १९९५ व २०१९ ला आमदार झाल्यानंतर तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती आली.टेंभू,म्हैसाळ व उजनीचे पाणी तालुक्याला आणले त्यातून निश्चितपणे शेतीचा व शेतकऱ्याचा विकास होणार असून तालुक्यात हरितक्रांती घडविण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे,यातच खरा आनंद आहे,असे विचार आमदार शहाजीबापू पाटील यांनी चिकमहुद येथे व्यक्त केले.

             सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील हे मुंबईवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून एबी फॉर्म घेऊन शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा.महूद येथे आले असता,आम.शहाजीबापू पाटील यांच्या स्वागत व सत्कारासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आ.शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की,सांगोला तालुका हा मजूर पुरवठा करणारा तालुका म्हणून तालुक्याची ओळख होती,हे चित्र बदलण्यात सध्या यश आले आहे.सांगोला तालुक्यातील शेती ही लवकरच मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येत असून आपल्या तालुक्यातील एकही गाव शेतीच्या व पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही.पुढील वर्षाच्या दिवाळीपूर्वी प्रत्येकाच्या शेतात पाणी पहायला मिळेल,अशी ग्वाही आ.शहाजीबापू पाटील यांनी यावेळी दिली.तसेच विरोधक माझ्यावर मोकळी टीका करतात.आधी त्यांनी काय केले ? हे तपासावे.या विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे-पाटील यांना पुन्हा एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मला १ लाख २५ हजार मते मिळतील,अशी खात्री व विश्वास असल्याचे सांगून भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या विचाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या व तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी मोठ्या मनाने मतदान करावे,असे आवाहन आ.शहाजीबापूंनी केले.

       चिकमहुद येथील सत्कार व स्वागत समारंभासाठी रेखाताई शहाजीबापू पाटील,वृषाली पाटील,वैशाली पाटील,राजलक्ष्मी पाटील,सरपंच शोभा कदम,ग्रा.पं. सदस्य सुनीता हुबाले,सोनाली काटे,दीक्षा कदम, उद्योगपती अजितकुमार ताटे,सागरदादा पाटील, दिग्विजयदादा पाटील,शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मुबिना मुलाणी,बाळासाहेब आसबे,संजय मेटकरी,बालाजी बागल,प्रितेश दिघे,समीर पाटील, दीपक ऐवळे,सुभाष इंगवले,दिलीप कारंडे,आप्पासाहेब सरगर,जगदीश पाटील,मधुकर कदम,शिवाजी घेरडे, लक्ष्मण भोसले आदी शिवसेना,युवा सेना पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी,मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

                 आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सत्कार समारंभासाठी व स्वागतासाठी चिकमहुद येथे जंगी तयारी करण्यात आली होती. फटाक्यांची आतिषबाजी व जेसीबीतून फुलांची उधळण करत आम.शहाजीबापू पाटील यांचे चिकमहुद येथे जंगी स्वागत करण्यात आले.सत्कार झाल्यानंतर कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन सभा आयोजित केली होती.यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.या कार्यक्रमासाठी बंधू आणि भगिनींची विशेष गर्दी पहायला मिळाली.
             ——————————————————————

महायुतीची उमेदवारी व एबी फॉर्मचा लखोटा म्हणजे,ऐतिहासिक व आनंददायी क्षण :

जे विरोधकांना तीन पिढ्या जमलं नाही,ते बापूंनी ५ वर्षात करुन दाखवलं. विरोधकांनी तालुक्याच्या विकासासाठी ५५ वर्षात आणलेला निधी व आमदार शहाजीबापू पाटील यांनी ५ वर्षात आणलेला निधी याची तुलना केल्यास बापूंना प्रथम क्रमांक मिळेल.तालुक्यात टेंभू,म्हैसाळ,उजनी व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर तालुक्यातील शेतकरी समृद्ध होईल.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खऱ्या अर्थाने राज्याला व तालुक्याला न्याय दिला आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना आणून महिलांना खऱ्या अर्थाने सन्मान दिला आहे.

आमदार शहाजीबापू पाटील यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मिळालेली महायुतीची उमेदवारी व एबी फॉर्मचा लखोटा म्हणजे, बापूंच्या जीवनातील एक ऐतिहासिक व आनंददायी क्षण आहे,असे मत यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजयदादा शिंदे,दादासाहेब लवटे,नितीन गायकवाड, एन.वाय.भोसले सर,दीपक दिघे,दत्ता नागणे,पांडुरंग हाके,राजनंदिनी पाटील, श्रीकांत पाटील,पंकज काटे आदींनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.                      —————————————

सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार  –

शहाजीबापू पाटील हे सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार असून यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या एका जबाबदार पदाधिकार्‍याने दिली.
——————————————