सांगोला :
सांगोला येथील डाॅ.केळकर प्रसूती व बालरोग हाॅस्पीटलच्या नुतन वास्तूचे तसेच प्रथमच नव्याने सुरु करण्यात आलेल्या श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे उदघाटन नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचे हस्ते रविवारी संपन्न झाले. याप्रसंगी, व्यासपीठावर डॉ.सुमनताई सरदेसाई,आमदार शहाजीबापू पाटील, आम.सुभाष देशमुख, आम.समाधान आवताडे, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,धैर्यशील मोहिते-पाटील व शेकापचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना.चंद्रकांत पाटील म्हणाले की, केळकर कुटुंबातील तिसरी पिढी वैद्यकीय व्यवसायात आपले योगदान देत आहे डॉ.रणजित केळकर यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय हा मोठ्या शहरामध्ये न करता त्यांचे आजोबा,वडील,आई यांच्याप्रमाणेच आपल्या भागातील लोकांची वैद्यकिय व समाजसेवा करता यावी, या उद्देशाने सांगोला सारख्या ग्रामीण भागात सुरु ठेवला, हा उत्तम संस्काराचाच एक भाग आहे. डॉ.संजीवनी केळकर, डॉ.सतिश केळकर हे देखील माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना सक्षम करण्याचे कार्य करीत आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील मुल होत नसलेल्या महिलांची अडचण लक्षात घेवून सांगोला सारख्या ग्रामीण भागात “टेस्ट ट्यूब बेबी” सेंटर सुरु करुन गोरगरीब कुटुंबाची गैरसोय दूर केली आहे. केळकर परिवाराने हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी कायमस्वरुपी एक मोफत बेड ठेवला, ही देखील एक कौतुकाची बाब असून मी देखील माझ्या व माझ्या पत्नीच्या नांवाने दोन बेड गोरगरीब महिलांच्या उपचारासाठी मोफत देत असल्याची घोषणाही नाम.चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
याप्रसंगी, आम.शहाजीबापू पाटील म्हणाले की, डॉ.केळकर कुटूंबियांनी वैद्यकीय व्यवसाय सांभाळत नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जपली असून
त्यांचे वैद्यकिय व सामाजिक कार्य वाखाणण्यासारखे आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.सुमनताई सरदेसाई यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात डाॅ.केळकर कुटूंबियांच्या या नव्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
सदर उदघाटन समारंभास शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी नगराध्यक्षा राणीताई माने, प्रा.पी.सी.झपके,बाबुराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष रफीकभाई नदाफ तसेच मारुतीआबा बनकर,भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी नगरसेवक आनंद माने,जेष्ठ विधीज्ञ पृ.भी.चव्हाण,तानाजीकाका पाटील, डॉ.एच.डी.गावडे,डॉ.शिवराज भोसले,डॉ.लिगाडे यांचेसह शहर व तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रणजित केळकर यांनी केले तर, आभारप्रदर्शन डॉ.सुपर्णा केळकर यांनी मानले.
—————————————————————————
More Stories
स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर