गिरगांवच्या सार्व.नवरात्रौत्सव मंडळाला मुख्यमंत्री शिंदेंनी दिली भेट

गिरगांव (मुंबई) :

                                    मुंबईच्या गिरगांव येथील “2 री खत्तर गल्ली, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी,त्यांचे स्वागत या मंडळाचे अध्यक्ष बात्रे यांनी केले.

याप्रसंगी,भारतीय जनता पार्टीच्या किसान सेलचे राज्याचे कोषाध्यक्ष तथा भाजपाचे धडाडीचे पदाधिकारी शशिकांतभाऊ देशमुख यांचे हस्ते मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना पगडी घालून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यासमयी, त्यांचेसोबत भाजपाचे माजी नगरसेवक आकाश राज पुरोहित तसेच या मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
—————————————————————————