विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रातही करिअर करावे – अध्यक्ष अमरसिंह देशमुख

नाझरे/प्रतिनिधी :

माझ्या शाळेत शिकणारा विद्यार्थी मोठा होतो याचा अभिमान तर आहेच,याहीपेक्षा तो मागे वळून शाळेकडे पाहतो,याचा जास्त अभिमान व आनंद आहे.या शाळेत शिकणारा माजी विद्यार्थी विजय नानासाहेब शिंदे यांच्या वडिलांनी जमीन विकून शाळा शिकवली,असे बाळू पंचाने सांगितले व आज ते पुण्यासारख्या ठिकाणी कंपनी काढून उद्योगपती झाले तर,यासाठी मोठ्या घरातच जन्माला यावे लागते असे कांही नाही तर,त्याचे शिक्षण व संस्कार महत्त्वाचे आहेत.आज विजय शिंदे यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रातही करिअर करावे,असे मत आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील बलवडी हायस्कूल येथे संगणक कक्ष व सी.सी.टी.व्ही. कक्षाचे उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी बोलताना अमरसिंह देशमुख पुढे म्हणाले की, शाळेचे मुख्याध्यापक संभाजी शिंदे व त्यांचा स्टाफ यांचे काम चांगले आहे आणि शाळेसाठी बलवडी गावाचे योगदान मोठे असून त्यांचे व आमचे नाते आपलेपणाचे आहे.या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी इंग्रजीचे ज्ञान घेणे गरजेचे असून यासाठी प्रयत्न करा व शाळेच्या अडीअडचणीसाठी कधीही एक फोन करा मदत करु,असे आश्वासन दिले. शाळेचे उपक्रम चांगले असून विशेष म्हणजे शाळेत येताना विद्यार्थी हे आई-वडिलांच्या पाया पडून येतात, ही गोष्ट आनंदाची आहे. विद्यार्थिनी चांगल्या बोलल्या परंतु विद्यार्थी बोलले नाहीत,यासाठीही प्रयत्न करा व ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे,असेही अमरसिंह देशमुख यांनी यावेळी सांगितले.

                                  प्रारंभी,प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थी व सध्याचे उद्योगपती विजयकुमार शिंदे यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना विजयकुमार शिंदे म्हणाले की,या शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक व सर्व स्टाफ चांगला आहे,त्यास सर्वांनी प्रोत्साहन द्यावे. कारण येथील उपक्रम नेहमीच चांगले असतात म्हणून या शाळेमुळे मी घडलो,असे ते म्हणाले.

               याप्रसंगी,डॉ.शिवाजीराव ढोबळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करावा. तसेच माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, मुख्याध्यापक एस.डी.शिंदे, विद्यार्थिनी वैष्णवी राऊत व श्रध्दा शिंदे यांनीही शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.यासमयी,संस्थेचे निरीक्षक प्रकाश नामदास, सरपंच माऊली राऊत,माजी उपसरपंच समाधान शिंदे, अँड.सत्यजित लिगाडे सरकार,पत्रकार रविराज शेटे, ग्रा.पं.सदस्य विलास तात्या धायगुडे, शिवाजी शिंदे, बाबासाहेब पालसांडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ.मनीषा शिंदे,सदस्य नवनाथ पालसांडे, दिनकर सांगोलकर,रघुनाथ शिंदे,हनुमंत राऊत सर, पालक प्रतिनिधी सूर्यकांत शिंदे सर,संजय शिंदे,सचिन चव्हाण,उमाजी राऊत,विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन एन.टी.करडे यांनी केले तर आभार शिक्षक एस.व्ही.बदडे यांनी मानले.
——————————————————————————