राजकीय

डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक

सांगोला :

सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरु झाली असून सांगोल्याचे सुप्रसिद्ध डॉ.परेश खंडागळे यांचे बंधू उन्मेष लक्ष्मणराव खंडागळे यांनीही प्रभाग क्रमांक ११ मधून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे.

सांगोला नगरपालिका हद्दीतील सांगोला-मिरज रोडच्या दक्षिण बाजूस असलेल्या वासूद रोड ते कडलास रोडअंतर्गत येणार्‍या भागातील सर्वच क्षेत्रातील नागरिक व मतदारांशी डॉ.परेश खंडागळे यांचा अगदी रोजचा व जवळचा संपर्क असून या संपर्काच्या जोरावर त्यांचे बंधू उन्मेष खंडागळे हे प्रभाग क्र.११ मधून निवडणूक लढवून यंदा सांगोला नगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाऊल ठेवण्याची जोरदार तयारी करत आहेत.

उन्मेष खंडागळे हे डॉ.परेश खंडागळे यांचे बंधू असून त्यांनीही निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने प्रभाग क्र.११ मधील इतर ईच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. डॉ.परेश खंडागळे यांचा वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात चांगलाच दबदबा असून त्यांच्या कार्याचा लाभ उन्मेष खंडागळे यांना मिळू शकतो,असे जाणकारांचे मत आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button