विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात रविवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

सांगोला :

           आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी रविवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल (मिरज रोड,सांगोला) येथे सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,युवासेना, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक केलेले विजय चौगुले आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.तरी,या बैठकीस सांगोला विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

        आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण करण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी रविवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल (मिरज रोड,सांगोला) या ठिकाणी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.सदर बैठकीस नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले हे मार्गदर्शन करणार आहेत.सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार शहाजीबापू पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत शिवसेना पक्ष वाढीसाठी चर्चा करण्यात येणार असून पदाधिकाऱ्यांच्या अडचणी,समस्या जाणून घेऊन त्यावर विचारविनिमय होणार आहे. त्यामुळे या बैठकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.या बैठकीस शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर,माजी गटनेते आनंदा माने,युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील, माजी नगराध्यक्षा राणीताई माने,विधानसभा प्रमुख प्रा.संजय देशमुख,उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे,पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर,महिला आघाडी तालुकाप्रमुख सीमा इंगवले,युवासेना तालुकाप्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे,विद्यार्थी संघटना जिल्हाप्रमुख प्रितेश दिघे,शिवसेना शहरप्रमुख समीर पाटील,शिवसेना विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे इ.पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
———————————————————————