महत्वाच्या बातम्या

प्रत्येक गावाचा विकास करणे हा माझा ध्यास – आ.शहाजीबापू पाटील

सांगोला :

एखतपूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही.अधिकाधिक निधी मंजूर करुन आणण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार असून प्रत्येक गावाचा विकास करणे हा माझा ध्यास असल्याचे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.

एखतपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा विकास जाधव यांची निवड झाल्याबद्दल आम.शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यासमयी, माजी पं.स.सदस्य सुभाष इंगोले,युवासेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे,ग्रामपंचायत सदस्य प्रवीण नवले,विकास जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

                       यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, आतापर्यंत एखतपूर गावातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून यापुढेही, सर्वसामान्य व गोरगरिबांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.  गावच्या विकासासाठी लोकांनी जागृत असले पाहिजे. एखतपूर गावाच्या विकासासाठी मी कटीबध्द आहे, अशी ग्वाहीही आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी दिली.
———————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button