राजकीय

काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांचा सांगोल्यात सत्कार

सांगोला :

काँग्रेस कमिटी अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी जतचे माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगली व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी,सांगोला तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे,युवक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष फिरोज मणेरी,जतचे दीपक कांबळे,पांडुरंग कांबळे,पत्रकार निसार तांबोळी,विकास गंगणे,अबुल हसन,शाहरुख मणेरी,चव्हाण यांचेसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button