सांगोला न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेजचे डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत घवघवीत यश
सांगोला :
गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहणार्या सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन मार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.
ही परीक्षा थेअरी,प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट व इंटरव्यू अशा एकूण चार टप्प्यामध्ये घेतली जाते.यावर्षी ही परीक्षा २१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती.या परीक्षेसाठी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मधून एकूण १२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यापैकी इयत्ता नववी मधील सानवी सुरेश गाडेकर ही पुढील प्रॅक्टिकल स्टेजसाठी पात्र झाली.तर,प्रगती चंद्रकांत पाटील व कृष्णाई सुरेश पाटील आणि इयत्ता सहावी मधून गौरी जगन्नाथ जाधव व दर्शन दीपक शिंदे हे प्रमाणपत्र साठी पात्र झाले.
गुणवंत विद्यार्थी सानवी सुरेश गाडेकर व तिचे पालक, मार्गदर्शक शिक्षिका स्मिता इंगोले मॅडम,गुळमिरे मॅडम, सायली खडतरे मॅडम व पाखले सर यांचा यथोचित सत्कार न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य हेमंत आदलिंगे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी, उपमुख्याध्यापक नामदेव कोळेकर सर,उपप्राचार्य केशव माने सर,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर, दशरथ जाधव सर,विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
——————————————————————————