सांगोला तालुका प्राथ.शिक्षक पेन्शनर संघटनेच्या अध्यक्षपदी वसंतराव दिघे तर,सचिवपदी अभिमन्यू कांबळे
सांगोला :
सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक पेन्शनर संघटनेच्या अध्यक्षपदी वसंतराव दिघे यांची तर,सचिवपदी अभिमन्यू कांबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक पेन्शनर संघटनेची बैठक सांगोला कार्यालयात वसंतराव दिघे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत सन २०२४ ते २०२६ साठी वरीलप्रमाणे निवड करण्यात आली.त्याचबरोबर,उपाध्यक्षपदी जयवंतराव नागणे व नामदेव भोसले, कार्याध्यक्षपदी अरुण वाघमोडे, खजिनदारपदी गंगाराम इमडे यांची निवड करण्यात आली.तर,संचालक म्हणून श्रीमती प्रतिभा शेंडे, अंबिका शिंदे,सुनंदा चव्हाण,दिनकर घोडके,एकनाथ जावीर,विलास नलवडे,बापूसाहेब लवटे,लक्ष्मण सावंत यांची निवड करण्यात आली.तसेच सहसचिवपदी दत्तात्रय खामकर तर,सल्लागार म्हणून प्रभाकर कसबे, सिद्धेश्वर झाडबुके,निवृत्ती मिसाळ,लक्ष्मण सावंत आणि प्रसिध्दी प्रमुख म्हणून रविराज शेटे यांची निवड करण्यात आली.
सदर निवडीनंतर साने गुरुजी कथामाला व गुंडोपंत झाडबुके यांच्या स्मरणार्थ सल्लागार सिद्धेश्वर झाडबुके गुरुजी यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे कार्यालय,रंगरंगोटी,सुशोभीकरण व नवीन सदस्य संघटनेत घेण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला.यावेळी मारुती काळे गुरुजी,मुलाणी गुरुजी, साळुंखे गुरुजी,नीलकंठ गुरुजी व इतर सदस्य उपस्थित होते.
——————————————————————————