सांगोला :
सांगोला तालुक्यातील कटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार शहाजीबापू गटाच्या सुवर्णा परमेश्वर हाके यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीनंतर आ.शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
सांगोला तालुक्यातील कटफळ ग्रामपंचायतीचे सरपंच विजय खरात यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या रिक्त जागेवर मंगळवारी नुतन सरपंचपदाची निवड घेण्यात आली.सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आमदार शहाजीबापू गटाकडून सुवर्णा परमेश्वर हाके यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. सरपंच पदासाठी सुवर्णा हाके यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून बुरुंगले यांनी काम पाहिले.कटफळ ग्रामपंचायतीवर आमदार शहाजीबापू पाटील गटाने झेंडा फडकवला आहे. सरपंच पदी सुवर्णा हाके यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
यावेळी उपसरपंच शहाजी खरात, माजी सरपंच दत्तात्रय बंडगर, अंबादास हांडे,रघुनाथ खरात,दत्तू कारंडे,माजी सरपंच शिवाजी खरात,माजी सरपंच अजित भिंगे,रघुनाथ तरंगे,लहानू वाघमोडे,हरिदास बंडगर,जेजीनाथ धंगेकर, ग्रामपंचायत सदस्य किसन धांडोरे,विजय खरात,जनाबाई चव्हाण,मंदाबाई शेळके, शोभा दुधाळ,नारायण बंडगर,कारंडे,सावंत, ग्रामसेवक बुरुंगले,पोलीस पाटील, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
———————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक