विहीरीत कचरा टाकणाऱ्या सांगोल्यातील रसवंती गृहावर झाली दंडात्मक कारवाई
सांगोला :
सांगोला शहरातील बस स्थानकातील विहिरीमध्ये कचरा टाकत असल्याचा व्हिडीओ नगरपरिषदेस आल्यानुसार नगरपरिषदेमार्फत शहानिशा केली असता,सदर व्हिडिओमधील व्यक्ती या नवनाथ रसवंती गृहामधील असल्याचे निदर्शनास आल्यानुसार या दुकानातील उसाचे चिपाड त्यांनीच विहिरीमध्ये टाकले असल्याने सदर दुकानावर सांगोला नगरपरिषदेने दंडाची कार्यवाही केली.
शहरातील कचरा संकलन करणेकामी सांगोला नगरपरिषदे मार्फत १० घंटागाड्या व ३ ट्रॅक्टरच्या सहाय्याने कचरा संकलित केला जातो.तसेच शहरातील व्यापारी वर्गांकडून कचरा संकलित करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.शहरातील नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये,यासाठी नगरपरिषदेमार्फत जाहीर दवंडी,आवाहन याद्वारे जनजागृती करुन माहिती देण्यात आलेली आहे. शहरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात त्यांचे घरातील व आस्थापना मधील ओला,सुका व घरगुती घातक असा वर्गीकृत कचरा नगरपरिषदेच्या घंटागाडीत (वाहनात) देतात.त्यामुळे शहर कचरामुक्त राहण्यास मदत होत आहे.
परंतु शहरातील बस स्थानकातील विहिरीमध्ये कचरा टाकत असल्याचा व्हिडीओ नगरपरिषदेस पाठविण्यात आल्यानंतर नगरपरिषदेमार्फत त्यानुसार शहानिशा केली असता,व्हिडिओ मधील लोक हे नवनाथ रसवंती गृहामधील असल्याचे निदर्शनास आले आणि याच दुकानामधील उसाचे चिपाड त्यांनीच विहिरीमध्ये टाकले असल्याने नगरपरिषदेकडून सदर दुकानावर दंडाची कार्यवाही करण्यात आली आहे.
——————————————————————————
नगरपरिषदेच्या वाहनातच कचरा द्यावा :
शहरातील नागरिकांनी व व्यावसायिकांनी नगरपरिषदेच्या वाहनातच कचरा द्यावा,इतरत्र टाकू नये अन्यथा नागरी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ चे तरतुदीनुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल.
– मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी
——————————————————————————