खा.निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची गुरुवारी सांगोल्यात बैठक

सांगोला :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,राष्ट्रीय समाज पक्ष,रयत क्रांती संघटना, आरपीआय (आठवले गट) या महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीमधील समाविष्ट घटक पक्षांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता सांगोला-मिरज रोडवरील हर्षदा लॉन्स येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीस महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,आमदार शहाजीबापू पाटील,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पंचायत समिती गणानुसार बैठक होणार आहे.

कोळा,जुनोनी,सोनंद,घेरडी,वाढेगाव,जवळा,उदनवाडी,नाझरे,कडलास,अजनाळे,वाकी-शिवणे,एखतपूर, महूद,चिकमहूद या पंचायत समिती गणातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तरी,या बैठकीस महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत,युवासेना संपर्कप्रमुख सागर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे,भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार,भाजपा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, रासपचे जिल्हाध्यक्ष सोमा मोटे,रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत चव्हाण,आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते आदींनी केले आहे.
——————————————————————————