सांगोला :
राजकारणाचा वापर हा समाजाच्या हितासाठी करुन राजकारणात मिळालेल्या संधीचा उपयोग हा जनतेच्या हितासाठी व न्याय हक्कासाठी करणे गरजेचे असते.
लोकशाहीत राजकारण हे खुर्चीसाठी नसून लोकांच्या सेवेसाठी असते, केवळ विकासाची काल्पनिक व खोटी चित्रे रंगवून राजकारण होऊ शकत नाही,असे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेकापचे युवा नेते डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला येथे व्यक्त केले.
यासंदर्भात बोलताना डाॅ.बाबासाहेब देशमुख पुढे म्हणाले की,आपल्या मतदारसंघातील सर्वच नागरिकांच्या मूलभूत व पायाभूत विकासासाठी सलोख्याचे समाजकारण व राजकारण करुन
स्व.आबासाहेबांनी (स्व.गणपतराव देशमुख यांनी) आमदारकीचे महत्व वाढविले.पण सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत राजकारणाकडे आणि अलिकडच्या लोकप्रतिनिधींकडे पाहिले की, राजकारणाचा स्तर हा इतका ढासळलेला आहे की,सध्याचे राजकारण हे केवळ पद,पैसा व सत्तेच्या पायरीवरती लोटांगण घालत असलेले आणि लाचार झालेले दिसून येते.जनतेच्या हिताच्या गोष्टींची या अलिकडच्या लोकप्रतिनिधींकडे वाणवा असल्याचे ते म्हणाले.
स्व.आबासाहेबांनी घालून दिलेल्या तत्त्वांचे अनुसरण करुन शेतकरी,कामगार व सर्व समाजाच्या प्रगतीसाठी आमचा संघर्ष सुरु ठेवू,हाच आमचा संकल्प असून संघर्षाच्या वाटेवर जनतेच्या न्यायाकरिता,बहुजनांच्या हितासाठी,जनतेच्या न्याय हक्कासाठी व जनसेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू,अशी ग्वाही डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली.
——————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक