राजकीय

नवी मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकविणार – दीपकआबा साळुंखे-पाटील

 

 

नवी मुंबई :

                    येणारी निवडणूक ही अत्यंत महत्वाची असून या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व नगरसेवक निवडून आणून यामध्ये मिळालेल्या बहुमताच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच झेंडा फडकविणार, अशी ग्वाही पक्षाचे निरीक्षक तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी बैठकीत दिली.

महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर,नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाशी येथील नुतन मध्यवर्ती कार्यालयातील महात्मा फुले सभागृहात नुकतीच पार पडली. सदर बैठकीत मार्गदर्शन करताना पक्षाचे निरीक्षक तथा माजी आम.दीपकआबा साळुंखे-पाटील हे बोलत होते. पुढील आठवड्यापासून प्रत्येक प्रभागांमधील सर्व बूथ सक्षम व सतर्क करण्यासाठी बैठका आयोजित कराव्यात,अशा सूचना त्यांनी यावेळी नुतन अध्यक्ष नामदेव भगत व महिला अध्यक्षा सलोजा सुतार यांना देवून तुम्ही घेतलेल्या बैठकांचा आढावा आम्ही घेणार असल्याचेही निक्षून सांगीतले.

याप्रसंगी,पक्षाचे प्रभारी तथा माजी मंत्री शशिकांत शिंदे,माजी खासदार आनंद परांजपे,नुतन अध्यक्ष नामदेव भगत,निरीक्षक प्रशांत पाटील,निरीक्षक भावनाताई घाणेकर,महिला अध्यक्षा सलोजा सुतार आदींनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यासमयी,नवी मुंबई येथील सर्व प्रभागातील प्रमुख पदाधिकारी,महिला कार्यकर्त्या तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button