सांगोला :
सांगोला नगरपरिषद व वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोमवारी महिलांकरिता आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीपणे पार पडले.
यावेळी बोलताना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी म्हणाले की, महिला या घरातील सर्वांची काळजी घेताना स्वत:च्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतात.याकरिताच,विशेष करुन महिलांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे व भविष्यातही नगरपरिषदेकडून असे उपक्रम राबविले जातील,अशी ग्वाहीही मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांनी यावेळी दिली.

प्रारंभी,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या शुभहस्ते करुन आरोग्य शिबीराची सुरुवात करण्यात आली.या शिबीरात सुमारे ११० महिलांची हाडातील ठिसूळपणाची तपासणी करण्यात आली. तपासणीकरिता वेदांत हॉस्पिटलचे डॉ.धवल अवताडे (एम.एस.आर्थो), डॉ.सौरव (एम.एस. आर्थो) व वेदांत हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता.
सदर शिबिरास जयनीला हॉटेलचे मालक विजय राऊत व विविध बचत गटातील ११० पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या.सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नगरपरिषदेचे समुदाय संघटक बिराप्पा हाके,शरद थोरात, शरद चव्हाण व सौ.सारिका लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहा.प्रकल्प अधिकारी
योगेश गंगाधरे यांनी केले तर,आभार सौ.सविता लोखंडे यांनी मानले.
————————————————
नगरपरिषद स्तरावर २०० पेक्षा जास्त महिला बचत गटांची स्थापना :
दि.अं.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (डीएवाय-एनयुएलएम) ही केंद्र पुरस्कृत योजना सांगोला नगरपरिषद राबवित असून सदर योजना ही शहरी दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सन २०१४-१५ पासून कार्यान्वीत झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिलांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने नगरपरिषद स्तरावर महिला बचत गटांची स्थापना करण्यात येते. या अनुषंगाने,शहरामध्ये आज २०० पेक्षा जास्त बचत गट कार्यरत आहेत. या योजनेच्या माध्यमातून नगर परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
– मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी
—————————————————————————
More Stories
स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर