सांगोला :
दिवाळीचा सण प्रत्येकजण मोठ्या आनंदात साजरा करतो पण, दारिद्र्यामुळे या आनंदापासून वंचित राहणार्या समाजातील कांही घटकांनाही दिवाळीचा आनंद लुटता यावा,यासाठी सांगोला रोटरी क्लबच्या वतीने अशा लोकांसाठीही दिवाळीच्या फराळ वाटपाचे नियोजन करण्यात आले होते.त्यानुसार,रोटरी क्लबच्या वतीने राजापूर येथील सुंदर आश्रमशाळेतील ९० विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्याचे आले. या माध्यमातून सुमारे ९० कुटूंबांची दिवाळी गोड करण्याचे भाग्य सांगोला रोटरी क्लबला लाभले असल्याची भावना रोटरी क्लबचे अध्यक्ष साजिकराव पाटील यांनी व्यक्त केली.
सांगोला रोटरी क्लबच्या वतीने प्रत्येक कुटुंबास मोतीचूर लाडू,बेसन लाडू,शंकरपाळी,चकली,चिवडा इ. प्रत्येकी सव्वा किलो दिवाळी फराळ देण्यात आला. यासाठी प्रत्येकाने अर्थसाहाय्य केले आहे.या दरम्यान,
रोटरी सदस्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक कोणता व्यवसाय करतात ? विद्यार्थी कोणत्या इयत्तेत शिकतो ? कोणत्या गावाहून आला आहे ? याबाबत विद्यार्थ्यांची प्रेमाने चौकशी केली.
यावेळी,दिवाळी फराळ मिळाल्याचा एक वेगळाच आनंद मुलांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळाला व दिवाळीचा फराळ मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी व आश्रमशाळेच्या संस्थाचालकांनी रोटरीचे आभार व्यक्त केले.याप्रसंगी,रो.दीपक चोथे,सचिव रो.सचिन पाटकुलकर,डाॅ.अनिल कांबळे,रो.बशीरभाई तांबोळी, रो.माणिक भोसले,रो.शरणाप्पा हळळीसागर,रो.मिलिंद बनकर,रो.अशोक नवले,रो.विकास देशपांडे,रो.अध्यक्ष साजिकराव पाटील व इतर उपस्थित मान्यवर होते.
———————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन