सांगोला :
सांगोला येथील चौंडेश्वरी क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दीपावली भेट म्हणून प्रत्येक सभासदास २ किलो साखर भेट वाटपाचा कार्यक्रम विठ्ठल मंदिर,कोष्टी गल्ली येथे नुकताच संपन्न झाल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन इंजि.मधुकर कांबळे यांनी दिली.
सदर कार्यक्रमाचे प्रारंभी श्री चौंडेश्वरी मातेच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ सभासद रमेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली.उपस्थित सर्व सभासदांचे व संचालकांचे स्वागत अनिल लाटणे यांनी केले.संस्थेचे चेअरमन इंजि. मधुकर कांबळे यांनी यासमयी पतसंस्थेच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.यावेळी सर्व संचालकांच्या शुभहस्ते साखर वाटप कार्यक्रम करण्यात आला.
सदर समारंभास व्हा.चेअरमन संजय लाटणे,संचालक राजकुमार दौंडे,अवधूत कुमठेकर,संजय कांबळे,विजय चोथे,शिवदास खडतरे,कुलदीप बाबर तसेच संस्थेचे सभासद भास्कर सपाटे,नामदेव कांबळे,अमर तारळेकर,हरिभाऊ बाबर,दीपक सपाटे,शकील शेख, शेषमल आमने,प्रमोद टेके,प्रमोद कलढोने,सौ.बोत्रे व सपाटे आजी आणि इतर सभासद उपस्थित होते.
सर्व सभासदांनी ११ नोव्हेंबर पर्यंत संस्था कार्यालयातून साखर घेऊन जाण्याचे आवाहन संस्था सचिव सौ.शितल डोईफोडे यांनी केले. शेवटी,माजी चेअरमन राजकुमार दौंडे यांनी आभार मानले.
——————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन