महत्वाच्या बातम्या

फराळ देऊन आपुलकीने तृतीय पंथीयांना दिल्या दिवाळीच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

 

सांगोला :

समाजातीलच एक घटक असलेल्या तृतीय पंथीयांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर,दिवाळी फराळासह कपडे देऊन त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करत त्यांना दिवाळीच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा देवून सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानने एक स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आपुलकीच्या सदस्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चौथ्या वर्षी आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प हाती घेऊन समाजापासून नेहमीच उपेक्षित राहिलेल्या व आपल्या उपजीविकेसाठी रस्त्यावर उभे राहून देणाऱ्याकडून मिळेल त्या रकमेतून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या तृतीय पंथीयांची दिवाळी थोड्या प्रमाणात का होईना गोड करण्यासाठी आपुलकीनं पुढाकार घेतला आणि सांगोला शहरातील चार तृतीय पंथीयांना दिवाळी फराळासह नवीन कपडे देऊन त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

यावेळी आपुलकी प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र यादव,हरिभाऊ जगताप गुरुजी,दादा खडतरे,अरविंद केदार, इंजि.विकास देशपांडे,रविंद्र कदम आदी आपुलकी सदस्य उपस्थित होते.
————————————————

पालावर राहणाऱ्यांनाही दिवाळी फराळ व भाऊबीजेची ओवाळणी भेट देणार :

वंचितांची दिवाळी गोड व्हावी म्हणून,सांगोला शहरातील विविध भागात पालावर राहणाऱ्या नागरिकांना दिवाळी फराळ व भाऊबीजेची ओवाळणी म्हणून साडी भेट देण्यात येणार असून त्यांच्या मदतीसाठी आपुलकीने सोशल मीडियावर आवाहन केल्यानंतर, आपुलकी सदस्य व देगणीदारांकडून सुमारे २६ हजार ५०१ रुपयांची देणगी जमा झाली आहे. त्या देणगीतून सुमारे ५० कुटुंबाना येत्या शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी दिवाळीची भेट देण्यात येणार आहे.                                                     – अध्यक्ष राजेंद्र यादव

———————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button