सांगोला :
अल्पावधीतच नांवारुपाला आलेल्या सांगोला येथील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने रविवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत पार पडलेल्या मोफत सर्व रोग निदान शिबीरामध्ये सांगोला शहर व तालुक्यातील सुमारे २०० पेक्षा जास्त रुग्णांनी आपल्या विवीध आजारांविषयी तपासणी करुन घेवून हॉस्पिटलच्या वतीने या शिबिरात देण्यात आलेल्या विशेष सवलतींचा लाभ घेतला.
सदर शिबिरामध्ये गर्भवती स्त्रियांची मोफत तपासणी, मोफत ईसीजी,मोफत शुगर तपासणी,मोफत डोळे तपासणी व इतर सर्वच आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.या शिबीरात स्त्रीरोग तज्ञ डॉ.परेश खंडागळे,डॉ.स्वाती खंडागळे,डॉ.स्वप्नाली बिराजदार, बालरोग तज्ञ डॉ.महावीर आलदर,डॉ.बसवेश्वर पाटील, डॉ.संतोष पाटील,सर्जन डॉ.बसवराज बिराजदार, अस्थिरोग तज्ञ डॉ.धवल अवताडे,मेडिसिन विभागाचे डॉ.सत्यनारायण,डॉ.प्रसाद साळे,डॉ.रवींद्र नाईकवाडी, नेत्ररोग तज्ञ डॉ.आशुतोष पाटील,डॉ.विनोद माळी, त्वचारोग तज्ञ डॉ.अश्विनी वरशेट्टी,डॉ.अश्विनी नाईकवाडी,कान,नाक व घसा तज्ञ डॉ.सुधीर कदम, डॉ.रमेश भुमन्नावर आदी तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करुन त्यांना योग्य तो औषधोपचार व सल्ला दिला.
—————————————————————————
More Stories
स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर