महाराष्ट्र

महिला साडीत छान वाटतात पण, महिलांनी कांही नाही घातलं तरी,त्या माझ्या नजरेत चांगल्या दिसतात – रामदेवबाबांचा बीभत्सपणा उघड

 

ठाणे :

अलिकडे राज्यात वादग्रस्त विधाने करुन स्टंटबाजी करण्याची राज्यपाल व राजकारणी मंडळीकडून जणू स्पर्धाच चालू असताना,त्यात आता योगगुरु रामदेव बाबांनीही वादग्रस्त विधान करुन भर घातल्याने “कुठे नेवून ठेवलायं,महाराष्ट्र माझा ?”अशी म्हणण्याची पाळी राज्यातील भोळ्या भाबड्या जनतेवर सध्या आली आहे. ठाणे येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रामदेव बाबा म्हणाले की,”महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात,महिला सलवार सूट मध्येही चांगल्या वाटतात आणि माझ्या नजरेत तर,कांही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात”. असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने याद्वारे रामदेवबाबांचा बीभत्सपणाच उघड झाल्यामुळे सर्व स्तरातून विशेषत: महिला वर्गातून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.

ठाण्यात एका आयोजित कार्यक्रमात रामदेव बाबांसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हजरजबाबी अर्धांगिनी अमृता फडणवीस तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित असताना रामदेवबाबांनी हे वादग्रस्त विधान केल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

ठाणे येथे महिलांसांठी एक योगप्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात सकाळी योग शिबिर झाल्यानंतर महिलांसाठी आयोजित केलेल्या महासंमेलन कार्यक्रमासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र,योग शिबीरानंतर लगेच महासंमेलन सुरु झाले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही, याविषयी चर्चा होवू लागल्याने बाबा रामदेव यावर म्हणाले की,”महिला साड्या नेसून चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्येही चांगल्या वाटतात आणि माझ्या नजरेत तर, त्या कांही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”त्यांच्या या वक्तव्याने सर्व स्तरातून विशेषत: महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button