आरोग्य

विविध आजारांवरील उपचारांसाठी सांगोल्यात खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा बोलबाला

 

सांगोला :

अल्पावधीतच रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या सांगोला येथील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचारांसाठी आता २४ तास सेवा व तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असल्याने सांगोल्यात खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा चांगलाच बोलबाला होवू लागला आहे.

डॉ.परेश खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली अत्यंत कमी काळात नांवारुपाला आलेल्या खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये ओपीडी,आयपीडी, आयसीयु,उच्चरक्तदाब (ब्लड प्रेशर),बीपी कमी होणे, मधुमेह (डायबेटिक),दमा,सर्पदंश,विषबाधा (विषारी औषध पिलेले असल्यास),अर्धांगवायू (paralysis), डेंग्यू,हृदयरोग (heart attack),थायरॉईड,फुफ्फुसाचे आजार अशा सर्व प्रकारच्या विविध आजारावर डॉ.सत्यनारायण (MBBS/MD/Medicine) तसेच डॉ.प्रसाद साळे (MBBS/MD/ Medicine) हे तज्ञ डाॅक्टर उपचार करणार आहेत.

त्याचबरोबर,सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, लिगामेंट तुटणे,गुडघे दुखी,कंबर दुखी,हाडांची झीज,हाडांचे सर्व आजार या सर्व गोष्टींचे निदान, उपचार व ऑपरेशन करण्यासाठी अस्थिरोग तज्ञ डॉ.धवल आवताडे (MS Ortho) हे देखील आता २४ तास उपलब्ध राहणार आहेत.तरी,या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.परेश खंडागळे,डॉ. बसवराज बिराजदार,डॉ.स्वाती खंडागळे व डॉ.स्वप्नाली बिराजदार यांनी केले आहे. —————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button