म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो अंतर्गत सांगोला विधानसभा मतदार संघासाठी ८ कोटी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे ग्रामीण भागातील रस्ते सुधारणे,विविध ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक टाकून रस्ते तयार करणे,सिमेंट काँक्रीट रस्ते करणे,अशा विविध गांवातील ८० कामांसाठी ८ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आम.शहाजीबापू पाटील यांनी दिली.

या निधीमधून ग्रामीण भागातील विविध गावातील मूलभूत नागरी सुविधा मजबूत होणार असल्याने गावे विकसित होणार आहेत.तसेच नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीनेही सोयीचे होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.  त्याचबरोबर,अल्पसंख्यांक मंत्री नाम.अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे १ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला असून या निधीमधून सांगोला नगरपरिषद हद्दीमधील मुस्लिम दफनभूमी येथे सुधारणा करणेसाठी २५ लाख,महूद बुद्रुक मधील पठाणवाडी येथील मस्जिद विकसित करणेसाठी २५ लाख,वाकी घेरडी येथील मुस्लिम समाज सभागृह बांधणेसाठी २५ लाख,जवळा गावातील ईदगाह सुशोभीकरण करणेसाठी २५ लाख रुपये,अशी कामे अल्पसंख्यांक बहुल भागासाठी मंजूर झालेली आहेत.                      वरील सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच कामे चालू करण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.तसेच कामे वेळेत व गुणवत्तापूर्वक करण्यात यावीत,अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
—————————————————————————