राजकीय

भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील

नवी दिल्ली/प्रतिनिधी :

18 व्या लोकसभेच्या कालावधीसाठी भारताच्या संसदेत स्थापन करण्यात आलेल्या भारत-संयुक्त अरब अमिराती (UAE) संसदीय मैत्री समितीत माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची सदस्य म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा अध्यक्षांनी ही नियुक्ती जाहीर केली असून, अधिकृत पत्राद्वारे माहिती देण्यात आली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील संसदीय व राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा मैत्री गट महत्त्वपूर्ण मानला जातो.

भारत आणि United Arab Emirates यांच्यात व्यापार, गुंतवणूक,ऊर्जा,संरक्षण,शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या विविध क्षेत्रांत घनिष्ठ संबंध आहेत. संसदीय मैत्री गटाच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या संवाद,अनुभवांची देवाणघेवाण आणि सहकार्य अधिक बळकट होणार आहे.ही नियुक्ती त्यांच्या संसदीय कार्यातील आणखी एक महत्त्वाची जबाबदारी मानली जात असून,मतदारसंघासाठीही हा अभिमानाचा क्षण आहे.
                    ==========================

संसदीय स्तरावर सकारात्मक भूमिका बजावण्याचा प्रयत्न करणार :

मला संधी दिल्याबद्दल मी भारत सरकारचे धन्यवाद व्यक्त करतो.तसेच भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी संसदीय स्तरावर सकारात्मक भूमिका बजावण्याचा प्रयत्न करणार.
– खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
==========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button