आरोग्य

वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने महूद येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

सांगोला :

सांगोला येथील वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र,महुद येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नुकतेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरामध्ये १५० रुग्णांची मोफत तपासणी करुन गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना सदर योजनेत मोफत उपचाराबाबत सल्ला देण्यात आला.सांगोला येथील वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रुग्णांसाठी २४ तास सेवा सुरु असून महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.या रुग्णालयात गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांवर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात असून महाराष्ट्रातील तज्ञ डॉक्टरांची टीम या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे.

                सदर हॉस्पिटलमध्ये हाडांच्या सर्व प्रकारच्या व मूत्राशयाच्या सर्व शस्त्रक्रिया शासनाच्या योजनेतून मोफत केल्या जातात,अशी माहिती महूद येथील शिबीरात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. यासमयी,महूद प्राथ.आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकक्षक डॉ.अविनाश खांडेकर,सहाय्यक अधीक्षक डॉ.पल्लवी राजगुरु,मोरे सिस्टर,बजबळकर परिचारक तसेच वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.प्रद्युम्न कुलकर्णी,निकीता सिस्टर,निर्मला सिस्टर, हरिश ब्रदर,सागर ब्रदर आणि डाटा ऑपरेटर एजाज शेख उपस्थित होते.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button