सांगोला :
चालू पावसाळी अधिवेशनात सांगोला विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग,प्रमुख जिल्हा मार्ग व इतर जिल्हा मार्ग,ग्रामीण रस्ते अशा १५ नवीन रस्त्यांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २४ कोटी ४५ लाख रुपये तसेच नाबार्ड योजनेमधून खवासपूर ते विठलापूर जोडणाऱ्या रोडवरील माण नदीवर नवीन पुलाच्या बांधकामासाठी १० कोटी ८० लाख रुपये असे एकूण ३५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला असून ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्ते व नवीन पुलाच्या कामांमुळे होणार्या दळणवळणाच्या सोयी सुविधांमुळे सांगोला तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याची खात्री आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सांगोला विधानसभा मतदार संघातील रस्त्याच्या कामांना पुरवणी अर्थसंकल्पात मंजुरी देऊन तातडीने निधीची तरतूद करण्याबाबत आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्र देवून मागणी केली होती. आमदार शहाजीबापू पाटील यांनी मागणी केलेल्या पत्राची मंत्रीमहोदयांनी दखल घेऊन चालू पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात वरीलप्रमाणे १५ नवीन रस्ते व पुलाच्या बांधकामासाठी निधीची तातडीने तरतूद केली.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झालेला निधी पुढीलप्रमाणे :
* दिघंची जिल्हा हद्द ते खवासपूर,लोटेवाडी,सोनलवाडी, एखतपुर,सांगोला,वाढेगाव,मेडशिंगी,आलेगांव,वाकी,घेरडी, वाणीचिंचाळे,भोसे या रस्त्यासाठी – ३ कोटी रुपये,
* प्रस्तावित राज्य मार्ग अजनाळे,यलमर मंगेवाडी,वाटंबरे, राजुरी,हटकर मंगेवाडी,जुजारपूर,जुनोनी,कोळा या रस्त्यासाठी – २ कोटी रुपये,
* बेनुर,जुनोनी,गौडवाडी रस्ता सुधारणा करण्यासाठी – ७० लाख रुपये,
* सांगोला,इमडेवाडी,लक्ष्मी दहिवडी हा रस्ता सुधारणे कामासाठी – ३० लाख रुपये,
* मांजरी,देवकते वाडी,धायटी,हलदहिवडी,गायगव्हाण ते राज्य मार्ग १४३ ला मिळणारा रस्ता सुधारणे – १ कोटी ५० लाख रुपये,
* बलवडी,चोपडी,बंडगरवाडी,सोमेवाडी,इराचीवाडी,कोळा, कोंबडवाडी ते किडेबिसरी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे – २ कोटी ७० लाख रुपये,
* जिल्हा हद्द चिंद्यापीर,चोपडी, हातीद,जुजारपूर ते प्र.जि. मा.१६४ ला मिळणारा रस्ता सुधारणा करणे – १ कोटी रुपये तसेच जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग प्र.जि.मा.११० ते अकोला,कोळी मळा,लोणविरे रस्ता सुधारणा करणे – ३ कोटी रुपये,
* महिम ते जैनवाडी रस्ता सुधारणा करणे – १ कोटी रु.,
* राज्य मार्ग १२५ ते कडलास (गायकवाड वस्ती ) ग्रामीण मार्ग – १११ मध्ये सुधारणा करणे – १ कोटी ५० लाख रुपये,
* कडलास,पवार वस्ती,मेटकर वस्ती ते आलेगाव रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लाख रुपये,
* भंडीशेगाव ते धोंडेवाडी (ता.पंढरपूर) ग्रामीण मार्ग २८ किमी रस्ता सुधारणा करणे – १ कोटी ५० लाख रुपये,
* ग्रामीण मार्ग – ४२१ कोळा ते मोलमांगे वस्ती रस्ता सुधारणा करणे – ७५ लाख रुपये,
* चोपडी ते यादव मळा रस्ता ग्रामीण मार्ग – ४ किमी रस्ता सुधारणा करणे १ कोटी ५० लाख रुपये व राजुरी ते प्र.रा. मा.६ रस्ता सुधारणा करणे – १ कोटी ५० लाख रुपये
असे एकूण २४ कोटी ४५ लाख रुपये तसेच नाबार्ड योजनेतून खवासपूर ते विठलापूर जाणाऱ्या रोडवरील माण नदीवर १० कोटी ८० लाख रुपये नवीन पुलाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
————————————————
मंजूर कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याकडे कटाक्ष :
चालू पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्ते कामांसाठी २४ कोटी ४५ लाख रु. तसेच बहुप्रतिक्षेतील खवासपूर- विठलापूर (आटपाडी) जोडणाऱ्या माणनदीवरील पुलाच्या बांधकामासाठी १० कोटी ८० लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर निधीतून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार रस्ते तसेच पुलाचे काम वेळेत करण्याकडे कटाक्ष ठेवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
– आम.शहाजीबापू पाटील
———————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक