मुंबई/प्रतिनिधी :
शेती पिकविण्यासाठी काम करणारे किसान हे जमिनीवर काम करतात तर,जीवाची पर्वा न करता समुद्राच्या अथांग सागरात मच्छिमारीसाठी जाणारेही किसानच असून मच्छिमार (कोळी) समाजाच्या विवीध समस्या सोडविण्यासाठी देशपातळीवरुन प्रयत्न करणार,अशी ग्वाही भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.राजकुमार चाहर यांनी दिली.
राष्ट्रीय मत्स्य किसान दिनानिमीत्त महाराष्ट्र भाजपा किसान मोर्चाचे वतीने बधवार पार्क,कुलाबा (मुंबई)येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात खा.राजकुमार चाहर हे बोलत होते. यावेळी,भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष शशिकांत भाऊ देशमुख, विधानसभेचे विद्यमान सभापती आम. राहुल नार्वेकर यांचे पिताश्री तथा माजी नगरसेवक सुरेश नार्वेकर,किसान मोर्चाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच मच्छिमार (कोळी) समाजातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी,भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चाहर यांनी मच्छी मार्केटमधील कोळी समाजबांधवांची समक्ष भेट घेवून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मच्छिमार समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेवून दिल्ली येथे केंद्रीय मत्स्य विभागाच्या मंत्रीमहोदयांची भेट घेणार असल्याचे सांगीतले.शेवटी,भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.
—————————————————————————
More Stories
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगोल्याचे नूतन सभापती व उपसभापती स्वीकारणार पदभार
सांगोल्याच्या सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे सांगोल्याच्या राजकारणाचा झालायं पार बट्ट्याबोळ