राजकीय

सांगोला बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान पाटील तर, उपसभापतीपदी माणिक वाघमारे

 

सांगोला :

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (मार्केट कमिटीच्या) चेअरमनपदी शेतकरी कामगार पक्षाचे समाधान पाटील तर,व्हा.चेअरमनपदी माणिक वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व.गणपतराव देशमुख यांचे कार्यकाळात कायम बिनविरोध होणारी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्व.आबासाहेब यांच्या निधनानंतर यंदा मात्र, मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील,राष्ट्रवादीचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील तसेच इतर शेकापविरोधी पक्षांनी सामंजस्याने बिनविरोध करायचे ठरवलेले असतानाही शेकापमधीलच गटबाजीमुळे बिनविरोध न होता निवडणूक घ्यावी लागली आणि शेवटी,शेकापसह आम.शहाजीबापू, माजी आमदार दीपकआबा यांच्या संयुक्त आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आले.

                       सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदाची निवड बुधवार दि.२४ मे रोजी सकाळी पार पडली. यावेळी, चेअरमनपदी शेकापचे समाधान पाटील तर,व्हा. चेअरमन पदी माणिक वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सदर निवडीवेळी शेकापचे जेष्ठ नेते चंद्रकांतदादा देशमुख,जेष्ठ नेते पोपटराव देशमुख, शेकापचे युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख,चिटणीस दादासाहेब बाबर,माजी सभापती गिरीश गंगथडे,माजी उपसभापती लक्ष्मण माळी,तसेच शेकापचे आजी माजी पदाधिकारी,ज्येष्ठ नेतेमंडळी, विवीध सहकारी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button