सांगोला :
सांगोला तालुक्यातील कोळा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त २८ मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास माजी आमदार रामहरी रुपनर, शेकापचे युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख,ठाकरे सेनेचे लक्ष्मण हाके यांची उपस्थिती लाभणार आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त शनिवार दि. २७ मे रोजी ५ वा.बिरुदेव गजनृत्य ओवीकार मंडळ वाशी (कोल्हापूर) शाहीर युवराज पुजारी व शाहीर कृष्णात रानगे यांच्या भव्य धनगरी ओव्या आणि रविवार दि.२८ मे रोजी सकाळी ८ वा.भव्य धावणे स्पर्धा, दुपारी ४ वा.धनगरी गजी नृत्य.तसेच सायंकाळी ५ वा.आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रामहरी रुपनवर,शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख व प्रा.लक्ष्मण हाके हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
त्याचबरोबर,२९ मे रोजी भव्य मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला असून जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अंबादास सरगर, उपाध्यक्ष विठ्ठल कोळेकर,सचिव बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे.
—————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन