सोलापूर ग्रामीणचे पो.हवालदार इकबाल शेख यांनी खंडाळा येथे केले प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन
सोलापूर :
महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी केडरच्या प्रशिक्षणार्थीं करिता सीसीटीएनएस प्रणाली तसेच केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आयसीजेएस सर्च पोर्टल व इतर महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे दि.८ मे ते २० मे २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या OPSU-1 सत्र क्र.१५ मध्ये सोलापूर ग्रामीणचे पुरस्कार प्राप्त हवालदार इकबाल शेख यांना आमंत्रित करण्यात आले असता,शेख यांनी यावर सखोल व अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
पोलीस हवालदार इकबाल शेख यांनी यावेळी, सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी यांना सीसीटी एनएस प्रणाली,पोलीस रेकॉर्ड वरून गुन्हे व गुन्हेगारांचा शोध घेणे तसेच गुन्हे प्रकटीकरणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अद्यावत माहिती उपलब्ध करून घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल प्राचार्य मकानदार सर,उपप्राचार्य पाटील सर, समन्वयक अधिकारी पो.नि.चंद्रकांत जाधव सर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा) यांनी पोलीस हवालदार इकबाल शेख सोलापूर ग्रामीण यांचा पुष्परोप देऊन सत्कार केला.
—————————————————————————