राजकीय

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शेकाप स्वबळावर लढणार – चंद्रकांतदादा देशमुख

 

सांगोला :

शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सांगोला तालुक्यातील जनतेने तालुक्यातील बहुतांशी सहकारी संस्थांवर आजवर शेकापलाच बहुमत दिले असून भवितव्यातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही तो विश्वास कायम राहील,अशी खात्री बाळगत,शेतकरी सहकारी सूतगिरणी व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत ज्या जि.प.गटाला संचालक मंडळात स्थान मिळाले नाही, अशा जवळा व घेरडी गटातील इच्छुकांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्राधान्य देण्यात येणार आहे.आगामी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शेतकरी कामगार पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे शेकापचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा देशमुख यांनी सांगितले.

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून त्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुकांची बैठक डॉ.भाई गणपतराव देशमुख शेतकरी सूतगिरणीच्या सभागृहात संपन्न झाली.यावेळी,जेष्ठ नेते बाबासाहेब करांडे,तालुका चिटणीस दादासाहेब बाबर,शहर चिटणीस भारत बनकर,माजी नगराध्यक्ष मारुती बनकर,माजी सभापती बाळासाहेब काटकर,उद्योगपती बाळासाहेब एरंडे,माजी जि.प.सदस्य सचिन देशमुख,संगम धांडोरे, किसन माने,गजेंद्र कोळेकर, मारुती ढाळे,विजय खरात,माजी सभापती गिरीश गंगथडे,नारायण पाटील, सीताराम सरगर,बाळासाहेब पाटील,अंकुश येडगे, सुनील चौगुले,लक्ष्मण माळी,संतोष देवकते,नंदू शिंदे,विनायक कुलकर्णी,पिंटू पुकळे, दीपक रूपनर, संतोष सराटे,उध्दव खांडेकर,नंदू यादव,मायाप्पा यमगर,नितीन जरे आदी उपस्थित होते.

—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button