आरोग्य

GBS चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधानता बाळगावी

सांगोला :

सध्या राज्यातील पुण्यासह इतर शहरांमध्ये जीबीएस (GBS – Gullian barre syndrome) च्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून पुण्याच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयामध्ये या आजाराने त्रस्त असे १०० पेक्षा जास्त रुग्ण दाखल करण्यात आले आहेत तर,त्यातील कांही रुग्ण हे व्हेंटिलेटरवरही आहेत.तसेच कांही दिवसांपूर्वी पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचेही समजते.वास्तवमध्ये राज्यात इतर खाजगी रुग्णालयात अजून किती रुग्ण आहेत,याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.त्यामुळे,GBS चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे सांगोला नगरपरिषदेच्या वतीने आणि तालुका आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.

कोरोनासारखा माणसांमध्ये GBS चा रुग्ण इतरांच्या संपर्कात आल्यामुळे GBS चा प्रादुर्भाव होत नाही किंवा पसरत नाही.तर,बाहेर खाल्ल्या जाण्याऱ्या अन्नामधून त्याची बाधा होत आहे.GBS चा संसर्ग झाल्यावर आपल्या शरीरामध्ये त्याच्या अँटीबाॅडीज तयार होऊन त्या आपल्या मज्जातंतूंवर हल्ला करतात, ज्यामुळे पक्षाघात (Paralysis) होतो. यामध्ये प्रथम कमरेखालचा भाग निष्क्रिय होतो,नंतर कमरेवरचा भाग आणि शेवटी मेंदू निष्क्रिय होतो, ज्यामुळे अशी बाधित व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते. हे टाळण्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

—————————————————————————

उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाऊ नये :

सध्या तालुक्यात जीबीएसचा एकही रुग्ण नाही.या रोगापासून आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी पुढील एक महिना तरी कुणीही प्रामुख्याने पाणीपुरी,चिकन,पनीर अशा पदार्थ्यांचे सेवन करु नये.तसेच बाहेरचे व उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाऊ नये.                       – डॉ.अविनाश खांडेकर (आरोग्य अधिकारी,सांगोला तालुका)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button