शिवाजी पॉलीटेक्निकचे हिवाळी परीक्षा-२०२४ मध्ये उत्तुंग यश

सांगोला :

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या अभियांत्रिकी पदविका हिवाळी परीक्षा-२०२४ मध्ये सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले असल्याची माहिती संस्थेचे सचिव अंकुश गायकवाड व प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी दिली.

          यामध्ये एकूण ७६८ विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षा दिली.त्यापैकी ४५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.तसेच एकूण ६ विद्यार्थ्यांनी विविध विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेचा निकाल ९०.४९ टक्के लागला असून द्वितीय वर्षाचा निकाल ६९.७१ टक्के लागला आहे.तर,अंतिम वर्षाचा निकाल ७७.७९ टक्के लागला आहे.

     अंतिम वर्षातील अभियांत्रिकीचा अभय गायकवाड याने ९५.०३ टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक,प्रांजली इंगोले हिने ९४ टक्के मार्क मिळवून द्वितीय क्रमांक, स्वप्नाली पाटील हिने ९३.६७ टक्के मार्क मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.तर,द्वितीय वर्षातील अभियांत्रिकी पदविकेच्या आशुतोष कोडक याने ९४.८२ टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक,शुभम माने याने ९३.५३ टक्के मार्क मिळवून द्वितीय क्रमांक व स्वप्नाली शिंदे हिने ९३.४४ टक्के मार्क मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या अमृता मिसाळ हिने ९३.१८ टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक,मृदुला पाटील हिने ९३.०६ टक्के मार्क मिळवून द्वितीय क्रमांक आणि गायत्री मिसाळ हिने ९३.०६ टक्के मार्क मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव अंकुशराव गायकवाड,विश्वस्त डॉ.यशोदीप गायकवाड,सर्व विश्वस्त मंडळ,प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख,सर्व विभाग प्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
——————————————————————————

९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

प्रथम वर्षातील विद्यार्थी :

अमृता मिसाळ (९३.१८ टक्के) मृदुला पाटील (९३.०६ टक्के), गायत्री मिसाळ (९३.०६ टक्के) तनुजा मोरे (९२.१२ टक्के) नेहा लेंडवे (९१.७७ टक्के) सृष्टी काशीद (९१.१८ टक्के) झीनत मुलाणी (९१.०६ टक्के) दीक्षा चव्हाण (९०.९४ टक्के)  गौरी नवले (९०.८२ टक्के)  साक्षी शेटे (९०.८२ टक्के), गौरी जाधव (८९.८८ टक्के).
—————————————

द्वितीय वर्षातील विद्यार्थी :

आशुतोष कोडक (९४.८२ टक्के),शुभम माने (९३.५३ टक्के),ऋषिकेश शेंडगे (९२.८२ टक्के),वैष्णवी भोसले (९२.३५ टक्के),साक्षी मेखले (९१.६५ टक्के),यशराज देशमुख (९१.३५ टक्के), अविनाश गव्हाणे (९१.२९ टक्के),तहूरा मुल्ला (९०.५९ टक्के),शाहिद मुजावर (८९.६५ टक्के),शितल सावंत (९२.३३ टक्के),स्वप्नाली शिंदे (९३.४४ टक्के),गौरी काटे (९२.८९ टक्के),गुरुप्रसाद कदम (९१.८८ टक्के).
—————————————

अंतिम वर्षातील,डीपी वर्षातील विद्यार्थी :

अभय गायकवाड (९५.०३ टक्के),सुशांत काशीद (९३.०३ टक्के),तनुजा मोरे (९३.०१ टक्के),अजित गायकवाड (९१.०६ टक्के),ऋतुजा मोहिते (९०.०३ टक्के),प्रांजली इंगोले (९४ टक्के),स्वप्नाली पाटील (९३.६७ टक्के),प्रवीण घाडगे (९२.८९ टक्के),कोमल सुरवसे (९२.११ टक्के),आर्या देशमुख (९२.११ टक्के),सानिका पवार (९२.११ टक्के),स्नेहल दिवसे (९१.२२ टक्के),सायली गव्हाणे (९०.११ टक्के),वैष्णवी चक्रे (८९.८९ टक्के),सानिका इंगवले (८९.६८ टक्के),अक्षता बाबर (९३.३७ टक्के),मेघा गायकवाड (९२.२१ टक्के), तनुश्री खटकाळे (९२.११ टक्के),पल्लवी लिगाडे (९१.३७ टक्के),प्रताप बुरंगे (९०.९५ टक्के),तुषार दिघे (९०.७६ टक्के).

बेसिक मॅथेमॅटिक्स या विषयात नेहा लेंडवे,सृष्टी काशीद,गौरी जाधव.तर,डी.एस.यु या विषयात शुभम माने तसेच ए.जे.पी.या विषयात पूनम माने आणि एम.डब्ल्यू.सी. या विषयात अक्षदा बाबर या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून कॉलेजचा नावलौकिक वाढवला आहे.