शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी नेहमी उत्तम संस्कार जोपासण्याचा प्रयत्न करावा – आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख

सांगोला :

उत्तम शिक्षण,उत्कृष्ट संस्कार व विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य यासाठी मेरीगोल्ड इंग्लिश स्कुल या शाळेचे शिक्षक व इतर कर्मचारी चांगले काम करत असून सर्व विद्यार्थीही त्यास चांगला प्रतिसाद देत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनीही नेहमी मोठी स्वप्ने पाहण्याचा,कठोर परिश्रम करण्याचा आणि उत्तम संस्कार जोपासण्याचा प्रयत्न करावा,असा मोलाचा संदेश आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिला.

सांगोला येथील मेरीगोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलला आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक कार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना प्रेरणादायी संदेश दिला.याप्रसंगी,शाळेचे पदाधिकारी व मार्गदर्शक आप्पासाहेब कोकरे,गोडसे मॅडम,खटके सर,खटके मॅडम, गायत्री मॅडम,शिवानी पोतदार,विद्याताई तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.यासमयी,आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण,विद्यार्थी केंद्रित अध्यापन,आधुनिक शिक्षणपद्धती,शिस्त व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

            आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रेरणादायी विचारांनी संपूर्ण शिक्षक वर्गाला नवी ऊर्जा मिळाली व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे शाळेच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प अधिक दृढ होईल,असा विश्वास यावेळी शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला.
===================================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button