राजकीय

महाराष्ट्रात स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली – आमदार शहाजीबापू पाटील

हजारो महिलांच्या उपस्थितीत भाळवणी येथे “जागर स्त्रीशक्तीचा होम मिनिस्टर” कार्यक्रम संपन्न

—————————————————————

सांगोला :

स्त्रीमध्ये भगवंताचा अवतार असून स्त्रीशक्ती महान होत आहे. महाराष्ट्रात स्त्रीशक्तीचा सन्मान व्हावा,या उद्देशाने महायुती सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” ही योजना सुरु केली.या योजनेमुळे स्त्रीशक्तीला अनमोल आनंद मिळत असून स्त्रीला स्वाभिमानी जीवन जगण्याचा हक्क मिळाला आहे,असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाळवणी येथे केले.

                         आमदार शहाजीबापू पाटील स्नेह परिवाराने भाळवणी (ता.पंढरपूर) येथे नवरात्र महोत्सवानिमित्त “जागर स्त्रीशक्तीचा होम मिनिस्टर” कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता.या कार्यक्रमाप्रसंगी आम.शहाजीबापू पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु केली. या योजनेतील पैसे महत्त्वाचे नसून त्या पाठीमागचा स्नेहभाव व प्रेम महत्त्वाचे आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गरिबीची जाणीव असल्याने त्यांनी महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांना खऱ्या अर्थाने न्याय देऊन विकासाच्या प्रवाहामध्ये आणले आहे.भाळवणी गट मोठा असून या भागातून आगामी निवडणुकीत मोठी साथ मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे आमदार शहाजीबापू यांनी सांगीतले.

या कार्यक्रमासाठी झालेली हजारो महिलांची उपस्थिती पाहून आमदार शहाजीबापू पाटील हे भारावून गेले.यावेळी शिवसेना नेते मारुती जाधव व शिवाजी बाबर यांनी मनोगतात सांगितले की,आमदार शहाजीबापू यांना विधानसभा निवडणुकीत भाळवणी गटातून समर्थ साथ देऊन, बापूंचे आमदारकीचे व मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण करु.स्त्रीशक्तीचा आशीर्वाद बापूंच्या पाठीशी आहे.आमदार शहाजीबापू यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी व पाठपुरावा करुन भाळवणी येथील शाकंभरदेवी मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास, आराखड्यात समावेश केला. त्याबद्दल भाळवणी येथे शहाजीबापू पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.विधानसभा राजकारण,समाजकारण म्हंटले की,बापूंचे नाव घ्यावे लागते.बापूंनी भाळवणी गटातील गावांसाठी खूप मोठा निधी दिला आहे.भाळवणी येथील नवरात्र महोत्सव निमित्त “जागर स्त्रीशक्तीचा होम मिनिस्टर” कार्यक्रम म्हणजे माता माऊलींचा सन्मान सोहळा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भाळवणी येथील विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या मान्यवर व्यक्तींचा सन्मान आम.शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.भाळवणी गटातील शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचा नागरी सत्कार करुन शुभेच्छा देत कायमस्वरुपी त्यांच्या पाठीशी राहू,असे आश्वासन दिले.

          या कार्यक्रमासाठी राजलक्ष्मीताई पाटील,अर्चना कदम, चंद्रमाला बागल,रुक्मिणी बागल,भगिरथी जाधव,सुमन माने, सुनील पाटील,भगवान चौगुले,रणजीत जाधव,धनंजय काळे, शिवाजी बाबर,हरिभाऊ शिंदे,भोजपा बाबर,राजकुमार पाटील, सागर चौगुले,संदीप पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते पदाधिकारी व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी महिलांना अनेक प्रकारच्या भेटवस्तू देण्यात आल्या.यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शाकंभरी देवीचे आशीर्वाद घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे जाहीर केले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button