सांगोला :
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सांगोला शहरातील नगरपालिका हद्दीतील आठवडा बाजार शेजारी ३६ दुकान गाळे (तळमजला व पहिला मजला) बांधकामासाठी २ कोटी ८७ लाख ९८ हजार ९९४ रुपये निधीची मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करुन त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.शहाजीबापूंची ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करुन निधी मंजूर केल्याने या निधीच्या माध्यमातून हे दुकान गाळे तयार होणार असून त्यामुळे,व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी याचा निश्चितपणे फायदा होणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोला नगरपालिका क्षेत्रातील आठवडा बाजार शेजारी ३६ दुकान गाळे (तळमजला व पहिला मजला) बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच हे काम सुरु होईल. गाळ्याचे काम पूर्ण होताच सुशिक्षीत बेरोजगार व व्यापारी वर्गाला शहरातील आठवडा बाजार शेजारीच आपला व्यवसाय करण्याची संधी मिळणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगीतले.
—————————————————————
More Stories
गावागावात,क्लस्टर स्तरावर शेतमाल खरेदी केंद्रांचे जाळे विस्तारुन ‘प्राईस डेफिशियन्सी पेमेंट’सारखी प्रणाली लागू करावी – खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर