आरोग्य

दक्षता मल्टीस्पेशालिटीमध्ये महिनाभर मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर

सांगोला :

                 सांगोला शहरातील दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोलापूर व सांगली जिल्ह्यातील  सांगोला,मंगळवेढा,जत,आटपाडी,पंढरपूर इ.विविध तालुक्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी (दि.१५ एप्रिल ते १५ मे २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत) संपूर्ण महिनाभरासाठी मोफत मूत्ररोग निदान,उपचार व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

मिरज-सांगली येथील सुप्रसिध्द मूत्ररोग तज्ञ डॉ.चेतन शहा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबिरामध्ये मूत्ररोग,मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार,किडनीचे आजार,किडनीतील खडे,मूत्रवाहिनीमधील खडे,मूत्राशयातील खडे,लघवी संबंधित आजार इ.आजारांवर मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत.

या शिबिरासाठी संबंधित रुग्णांनी आपले जुने रिपोर्ट व फाईल्स घेऊन यावे.ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे,अशा रुग्णांवर होणारी शस्त्रक्रिया ही केशरी,पिवळे तसेच पांढऱ्या रेशन कार्डधारकांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना यांच्या मार्फत पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. मोफत मूत्ररोग उपचार शस्त्रक्रिया शिबीराचा सर्व गोरगरीब गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन दक्षता हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button