शैक्षणिक

शिवाजी पॉलिटेक्निकच्या प्रा.श्रीया कुलकर्णी सेट परीक्षा उत्तीर्ण

सांगोला :

सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या जनरल सायन्स अँड ह्युमॅनिटीज विभागातील गणित विषयाच्या अधिव्याख्यात्या प्रा.श्रीया श्रीगणेश कुलकर्णी या विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे यांनी एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या राज्य पात्रता (सेट) परीक्षेमध्ये गणित विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत.

                           प्रा.श्रीया कुलकर्णी या २०२० पासून शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना गणित विषयाचे अध्यापन करीत आहेत. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण सांगोला येथे झाले असून त्यांनी गणित विषयाचे पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले आहे.सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

          प्रा.श्रीया कुलकर्णी यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष एम.आर.गायकवाड,सचिव ए.आर.गायकवाड,सर्व संचालक मंडळ व सदस्य,प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख, उद्योगपती सुरेश फुले,सर्व विभाग प्रमुख,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button