महत्वाच्या बातम्या

माण नदीत येत्या २ दिवसात पाणी सोडणार – डॉ.बाबासाहेब देशमुख

सांगोला :

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे ओव्हरफ्लो झालेले पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेतून येत्या २ दिवसात माण नदीच्या पात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

विस्तारीत टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाविषयी पुणे येथील सिंचन भवन येथे नुकतीच बैठक संपन्न झाली.या बैठकीस खासदार धैर्यशील मोहिते-पाटील,शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख,उद्योजक अभयसिंह जगताप,काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख, सुरेंद्र गुदगे,मनोज पोळ,अनिल देसाई,सुभाष नरळे सर,मुख्य अभियंता गुणाले साहेब,कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह सिंचन भवनमधील इतर अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून धरणाच्या पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.पूरसदृश्य परिस्थिती तयार झाल्यामुळे सर्व उपसा सिंचन योजना त्वरीत सुरु करुन ओव्हरफ्लोचे पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात सोडावे,अशी आग्रही मागणी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सदर बैठकीत लावून धरली होती.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या आग्रही मागणीमुळे टेंभू ओव्हरफ्लोचे पाणी हे २ दिवसात दुष्काळी भागात सोडण्यात येणार असल्यामुळे माण नदीत पाणी येणार आहे.त्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतातील जळून जाणारी उभी पिके वाचणार असून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

तसेच जुनोनी (ता.सांगोला) येथील पाणीवापर संस्थेचा राज्यात नावलौकीक आहे.प्रत्येक मोटारीला मीटर असताना व वेळेवर पाणीपट्टी भरली जात असतानाही कालवे फोडले म्हणून जुनोनी भागातील शेतकरी बांधवांवर राजकीय दबावापोटी चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदरचे गुन्हे मागे घेण्याची मागणीही डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली. यावेळी सदर गुन्हे मागे घेवू,असे आश्वासन अधिकार्‍यांकडून देण्यात आले. त्याचप्रमाणे उजनी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सद्य:परिस्थितीत १०० टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या ओव्हरफ्लो पाण्यातूनही पंढरपूर तालुक्यातील उपरी,भंडीशेगांव,पळशी,सुपली, वाडीकुरोली,शेळवे, केसकरवाडी बंधारे व साठवण तलाव पुर्ण क्षमतेने भरुन मिळावेत,अशी मागणीही यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली होती. त्यास संबंधित अधिकार्‍यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्यामुळे उपरी,भंडीशेगाव, पळशी,सुपली,वाडीकुरोली, शेळवे, केसकरवाडी बंधारे लवकरच भरुन देण्यात येणार असल्याचेही डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी सांगितले.
—————————————————————

विस्तारीत टेंभू योजनेतून सिंचन योजनांची कामे सुरु होणार :

                विस्तारीत टेंभू योजनेमध्ये बुध्देहाळ,चोपडी, ,पाचेगाव (खु॥),सोमेवाडी,बंडगरवाडी,चिणके (अंशत:),अजनाळे,लिगाडेवाडी,खवासपूर,लोटेवाडी  (जुनी व नवी),मंगेवाडी (अंशत:),सोनलवाडी,वझरे, डोंगरगाव,हणमंतगाव,हटकर मंगेवाडी,मानेगाव, काळूबाळूवाडी,गुणाप्पावाडी आदी गावांचा समावेश करुन या गावातील सिंचन योजनांची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहेत.
                                            – डॉ.बाबासाहेब देशमुख
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button