जवळ्याच्या सुनिता शिंदे पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा उत्तीर्ण
सांगोला :
कै.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.आण्णासाहेब घुले सरकार ज्युनिअर कॉलेज,जवळे (ता.सांगोला) या विद्यालयातील ग्रंथपाल सुनिता शिंदे या ७ एप्रिल २०२४ रोजी पुणे विद्यापीठातून घेण्यात आलेल्या सेट परिक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.
जवळा येथील कै.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.आण्णासाहेब घुले सरकार ज्युनिअर कॉलेज,जवळा (ता.सांगोला) विद्यालयातील सुनिता विलास शिंदे या २००२ सालापासून ग्रंथपाल या पदावर कार्यरत होत्या. त्यांनी सलग २२ वर्षे ग्रंथपालाचे काम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले.या त्यांच्या ग्रंथपालाचे कामाचे अनुभवाच्या जोरावर त्यांनी पुणे विद्यापीठातून एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेली सेट परीक्षा दिली होती.
या परीक्षेचा निकाल सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून यामध्ये ग्रंथपाल सुनिता विलास शिंदे या उत्तीर्ण झाल्या आहेत. सुनिता शिंदे यांना या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,प्राचार्य बाळासाहेब शिंदे, सचिव सुभाष लऊळकर यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
——————————————————————————