वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करणार – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला :
वृत्तपत्र विक्रेत्याचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर स्थापन करण्याविषयी आपण महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी नुकतीच दिली.
वृत्तपत्र विक्रेत्याचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात दिले होते परंतु,अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यासाठी,महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार,सरचिटणीस विकास सुर्यवंशी,कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार,पश्चिम महाराष्ट्राचे ज्येष्ठ सल्लागार शिवगोंडा खोत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी कोषाध्यक्ष गोरख भिलारे, सांगोला तालुका अध्यक्ष रविराज शेटे,सचिव उत्तम काका चौगुले,उपाध्यक्ष अमोल बोत्रे,सौ.संगीता चौगुले, दत्तात्रय पवार इत्यादींच्या शिष्टमंडळाने आमदार शहाजीबापू पाटील यांची समक्ष भेट घेऊन स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्याविषयी निवेदन देवून विनंती केली.
यावेळी शिष्टमंडळाला शब्द देताना “मुख्यमंत्र्यांकडे याबाबत यापूर्वीही आपण बोललो असून यापुढेही निश्चितपणे पाठपुरावा करु”,असे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी सदर शिष्टमंडळास दिले.
——————————————————————————