राजकीय

खा.राहुल गांधींनी स्वतःला का मारुन घेतले चाबकाचे फटके ? वाचा ब्रेकींग न्यूज..

 

 

तेलंगणा :

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला दक्षिण भारतात भरपूर प्रतिसाद मिळत असून या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान खा.राहुल गांधींनी स्वतःला चाबकाचे फटके मारुन घेतल्याने तो एक सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या ५७ व्या दिवशी राहुल गांधी हे तेलंगणाच्या पारंपारिक बोनालू महोत्सवात सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांनी, जाड दोर उचलला आणि ‘पोतराज ‘चा अवतारही घेतला. ‘पोतराज’ हे बोनालू उत्सवातील खास आकर्षण असते. ‘पोतराज’ बनणारी व्यक्ती आपल्या शरीराला चाबकाने मारते. पोतराज हा बोनालू सणाची देवी महाकालीचा भाऊ आहे, जो देवीच्या रक्षणासाठी चाबूक मारतो. तेथील परंपरेनुसार, पोतराज हे महाकाली देवीचे वेगवेगळे रुप असलेले सात बहिणींचे भाऊ मानले जातात. या यात्रेदरम्यान इतर काँग्रेस नेतेही या अवतारात दिसून आले. बोनालू उत्सवादरम्यान, तेथील स्त्रिया ‘पोथाराजू’ (पोतराज) च्या नेतृत्वाखाली मंदिरामध्ये मिरवणूक काढतात.

या मिरवणूकी दरम्यान,सर्वजण ढोलाच्या तालावर खूप नाचतात व तिच्या दोरीने जमा झालेल्या गर्दीला चाबकाचे फटकेही मारतात. त्याच अनुशंगाने, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, “एक व्यक्ती हातात चाबूक घेऊन फिरत आहे, तेवढ्यात राहुल गांधी तिथे आले आणि या समुदायात सामील होवून तेथील परंपरेप्रमाणे स्वत:ही चाबकाने मारुन घ्यायला सुरुवात केली. राहुल गांधींचा हा सहभाग तिथे उपस्थित असलेल्या लोकांना खूप आवडला.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी तेलंगणातील १९ विधानसभा आणि ७ संसदीय मतदार संघ कव्हर करेल.दि.४ नोव्हेंबरला ही यात्रा एक दिवसाचा ब्रेक घेणार असून भारत जोडो यात्रेदरम्यान, खा.राहुल गांधी हे बुद्धिजीवी व विविध समाजातील नेत्यांसह क्रीडा, व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींच्या भेटी घेत आहेत. भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरुवात झाली होती ती आता, ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्याने दिली.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button