पंढरपूर :
कार्तिकी एकादशीनिमीत्त पंढरपूर येथील विठ्ठल -रुक्मिणी मंदीरात शुक्रवारी पहाटे आयोजित केलेल्या शासकिय महापूजेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांचेसह पंढरपूर येथे वारकऱ्यांसोबत फुगडीवर ठेका धरुन कार्तिकी वारीचा आनंद लुटला.
जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवारकऱ्यांसोबत “ज्ञानोबा माऊली तुकाराम” या जयघोषावर ठेका धरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रंगत आणली. ज्ञानोबा-माऊली तुकारामाचा जयघोष सुरु असताना फडणवीस यांनी गळ्यात टाळ अडकावून बालवारकरी व इतर वारकऱ्यांना साथ दिली. तर,अमृता फडणवीस यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ – मृदुंगाच्या गजरात फेर धरला.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही. दोघांनीही बालवारकरी व इतर वारकऱ्यांसोबत फुगडी खेळून कार्तिकी वारीचा आनंद साजरा केला.
यासमयी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचा शासकीय विश्रामगृह येथे जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी,आम.सुभाष देशमुख, आम.समाधान आवताडे, विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री बबनराव पाचपुते,मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ व आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले उपस्थित होते.
—————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन