आरोग्य

सांगोल्याच्या दक्षता हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत व यशस्वीरित्या संपन्न

 

सांगोला :

सांगली,मिरज,सोलापूर,कोल्हापूर यासारख्या मोठ्या शहरात होणारे विविध प्रकारचे मुतखडा,किडनीतील खडे,मूत्रवाहिनी मधील खडे, मूत्राशयातील खडे,प्रोस्टेट ग्रंथीची सूज असे गुंतागुंतीचे ऑपरेशन (शस्त्रक्रिया) आता सांगोल्यातील दक्षता हॉस्पिटलमध्येही मोफत होत असून गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत विविध प्रकारच्या १०० पेक्षा जास्त गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या मोफत आणि यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.तसेच दक्षता हॉस्पिटलच्या अत्याधुनिक फिजिओथेरपी युनिटचे उदघाटन जेष्ठ व सुप्रसिध्द सर्जन डॉ.अमर शेंडे यांच्या हस्ते नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

         दक्षता हॉस्पिटलच्या अत्याधुनिक फिजिओथेरपी युनिटच्या उदघाटन प्रसंगी फिजिओथेरपिस्ट डॉ.ऐश्वर्या देशमुख,डॉ.मच्छींद्र सोनलकर,डॉ.राहुल माने,डॉ.चेतन शहा,डॉ.सुदीप चव्हाण,तसेच दक्षता हॉस्पिटलचे संचालक सर्वश्री डॉ.शिवराज भोसले,डॉ.संतोष शिंदें,डॉ.धनाजी जगताप,डॉ.सुहास पाटील,डॉ.दत्तात्रय इंगोले,डॉ.अभिजित सोनलकर,डॉ.फिरोज तांबोळी,डॉ. प्रवीण पैलवान व इतर मान्यवर उपस्थित होते.सांगोला येथील प्रतिथयश अशा दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आत्तापर्यंत पार पडलेल्या विविध प्रकारच्या १०० पेक्षा जास्त गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अत्यल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी डॉक्टर्स,मेडिकल ऑफिसर,ऑपरेशन थिएटर स्टाफ,नर्सिंग स्टाफ,डेटा ऑपरेटर,कर्मचारी वर्ग,आरोग्यमित्र अशा अनेक लोकांनी मेहनत घेतली.या सर्वांचा सन्मान व अभिनंदन करण्याकरिता दक्षता हॉस्पिटलच्या संचालक मंडळाच्या वतीने छोट्याशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये मूत्ररोग तज्ञ डॉ.चेतन शहा,भुलतज्ञ डॉ.शीतल येलपले, सर्जन डॉ.अमर शेंडे, रेडिओलॉजिस्ट डॉ.राहुल माने, फिजिशियन डॉ.सुशांत बनसोडे,डॉ.निरंजन केदार, डॉ.अण्णासो लवटे,मेडिकल ऑफिसर डॉ.महादेव जगताप,डॉ.वृषाली खांडेकर,डॉ.मुजीब इनामदार,डॉ. प्रतिक चव्हाण,डॉ.रविना,डेटा ऑपरेटर संदीप किरगत, एजाज शेख,आरोग्यमित्र सुभाष बनसोडे,सर्व नर्सिंग स्टाफ,लॅब व एक्स रे तंत्रज्ञ,सर्व कर्मचारी वृंद यांचे हार,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन दक्षता हॉस्पिटलचे डायरेक्टर्स यांचेवतीने अभिनंदन करण्यात आले.

दक्षता हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे विभाग कार्यरत असून यामध्ये जनरल मेडिसिन-आय.सी.यु.,मूत्ररोग, अस्थीरोग,फिजिओथेरपी,सर्जिकल,सोनोग्राफी विभाग हे कार्यन्वित असून याचा सांगोला शहर व तालुक्यातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button