दीपकआबांच्या गावभेट व जनसंवाद दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद

सांगोला :

                       सांगोला तालुक्यातील विवीध गावांसह वाड्यावस्त्यांना भेट देवून व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी सुरु केलेल्या गांवभेट आणि जनसंवाद दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी दीपकआबा यांनी कोळा परिसरातील हजारो नागरिकांशी संवाद साधला.

माजी आमदार दीपकआबांनी सुरु केलेल्या गावभेट दौऱ्याला कोळा परिसरातील नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याने सोशल मीडियावर आबांच्या गावभेट व जनसंवाद दौऱ्याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. या गांवभेट दौऱ्यात कोळा परिसरातील शेकडो महिलांनी दीपकआबांपुढे आपल्या व्यथा मांडल्या. आबांनी क्षणाचाही विलंब न करता “ऑन द स्पॉट” कोळा परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्नही केला.

        माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी कोळा (ता. सांगोला) येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाचे आणि ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली.यावेळी, कोळा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दीपकआबांचे पारंपरिक गझी ढोल व हलग्यांच्या निनादात स्वागत केले. दौर्‍यादिवशी दिवसभर दीपकआबांनी कराडवाडी, कोंबडवाडी,मदनेवस्ती,माळेवाडी,गुंडाळेवस्ती,इराची वाडी,बोधगिरे वस्ती या वाड्यावस्त्यांवर व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.तसेच कोळा गांवभागातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

                 यावेळी त्यांचेसोबत जेष्ठ नेते संभाजीतात्या आलदर,माजी सरपंच शहाजी हातेकर,पै.हरी सरगर, संतोष करांडे,शिवाजीराव कोळेकर,महेश ओतारी, भारत आलदर,संदिपान आलदर,सुरेश कचरे,अजय पडळकर,दादा कोळेकर,उत्तम हांडे,नामदेव आलदर, मदन पाटील,मारुती कोळेकर,दादा कोळेकर,मारुती सरगर,दादा आलदर,विजय पांढरे,शिवाजी आलदर, विनायक आलदर,प्रतीक आलदर,विनोद काटे,सतीश काटे,धनंजय काटे,भीमराव काटे,नंदू मोरे,अजित मोरे, नामदेव हातेकर,रामचंद्र हातेकर,संभाजी हातेकर, विजय आलदर,शिवाजी आलदर,काकासाहेब पांढरे सर,विष्णू सरगर,संभाजी गोडसे,दत्ता सागर,साहेबराव गुंडाळे,पांडुरंग आलदर,अमोल कोरे,विनोद देशमुख, तुकाराम आलदर,दीपक माने,शंकर सोनवणे,अमोल माने,लक्ष्मण सरगर,पांडुरंग वावरे,सुभाष सरगर, तातोबा सरगर,अनिल सरगर,अर्जुन सरगर,बिरा सरगर,तानाजी सरगर,नवनाथ करांडे,जगन्नाथ घाडगे, दादा करांडे,दादा कोळेकर,श्रीमंत सरगर,महादेव पुजारी,रावसाहेब आलदर,ईश्वर घाडगे,दादा सरगर, दादा बोधगिरे,समाधान सरगर,सुखदेव,करचे,ज्ञानू मेटकरी,मुरलीधर सरगर,संतोष सरगर,महादेव सरगर, शिवाजी सरगर,शंकर सरगर,अकिब पटेल,अस्लम पटेल आदी उपस्थित होते.

सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्याने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर व वाड्यावस्त्यांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असल्याने सांगोला तालुक्यात माजी आमदार दीपकआबांच्या गावभेट व जनसंवाद दौऱ्याची सर्वत्र चर्चा व स्वागत होत आहे.दौऱ्याच्या पहिल्या दिवशीच वयोवृध्द नागरिक तसेच महिला आणि विशेषतः युवकांनी या दौऱ्यात आपल्या समस्या मांडल्या.यावेळी जागेवरच सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क करुन नागरिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या त्यांनी सूचनाही दिल्या.

                   ———————————————————

औक्षण करुन वाड्यावस्त्यांवरील महिलांनी केले आबांचे उत्स्फूर्त स्वागत :

कोळा परिसरातील वाड्यावस्त्यांवर माजी आमदार दीपकआबांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आबांच्या या दौऱ्यात महिलांचा मोठा सहभाग होता. प्रत्येक ठिकाणी महिलांनी औक्षण करून आबांचे स्वागत केले आणि आपल्या व्यथा आबांसमोर मांडल्या.आबांनीही यावेळी जागेवरच महिला,ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. तसेच “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेचा महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहनही केले.
        ———————————————————————