सांगोला :
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सर्वात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या जिल्हा नियोजन (डी.पी.डी.सी.) समितीवर राज्य सरकारच्या लेखी पत्राद्वारे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य ५ जणांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे गेली अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहेत.महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्वही केले आहे. अनेक वर्षापासून ते सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहत आहेत. अनेक वर्षे या समितीवर काम करण्याचा अनुभव त्यांना असल्याने त्यांच्या अनुभवाचा या समितीला नक्कीच लाभ होईल आणि रखडलेल्या विकास कामांना गती मिळेल.
——————————————————————————
रखडलेल्या विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न करु :
जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करणारी जिल्हा नियोजन समिती ही अत्यंत महत्वाची समिती आहे. याद्वारे राज्य सरकारकडून सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त विकास निधी खेचून आणू आणि समितीमधील सर्वांना विश्वासात घेऊन जिल्ह्याच्या संतुलित आणि सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न करु.तसेच जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न करु.
– दिपकआबा साळुंखे-पाटील
——————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक