राजकीय

पहिल्या तीन टप्प्यातील प्रचारात मोदीच नंबर वन

नवी दिल्ली :

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा शनिवारी ११ मे रोजी थंडावल्या असून प्रचारासाठी उमेदवारांच्या मतदार संघात सर्वच दिग्गज नेतेमंडळी तळ ठोकून आहेत.देश पातळीवरील पहिल्या ३ टप्प्यातील प्रचार सभांची आकडेवारी पहिली तर,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात जास्त सभा घेऊन रेकॉर्ड केले आहे. पहिल्या ३ टप्प्यात मोदींनी तब्बल ८३ सभा घेतल्याने पहिल्या ३ टप्प्यातील प्रचार सभांच्या रणधुमाळीत मोदींचा नंबर वन लागतो तर,राहुल गांधी तिसर्‍या नंबरवर आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,प्रचार सभांच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३१ मार्च ते ५ मे या पहिल्या तीन टप्प्यांत ८३ प्रचारसभा घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत.तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्या क्रमांकावर आहेत.अमित शहा यांनी ६६ सभा आणि रोड शो केले आहेत. या काळात मोदींनी १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ८३ निवडणूक सभा आणि ‘रोड शो’मध्ये भाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तुलनेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी ४० निवडणूक प्रचार सभांना संबोधित केले तर,प्रियांका गांधी यांनी २९ प्रचार सभांमधून जनतेला संबोधित केले आहे. निवडणूक प्रचारात ३१ मार्च ते ५ मे या तीन टप्प्यांतील सर्वाधिक निवडणूक प्रचार सभा घेण्याचा विक्रम मोदी यांच्या नावावर झाला आहे.

एकूण ८३ निवडणूक सभा घेऊन मोदींनी आपल्या पक्षातील सर्व नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना मागे टाकले आहे.१४ मे रोजी मोदी हे वाराणसीमधून उमेदवारी दाखल करणार आहेत. तत्पूर्वी १३ मे रोजी त्यांच्या विशाल रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button