सांगोला तालुक्यातील सोनंदजवळ भीषण अपघात
सांगोला :
सांगोला ते जत मार्गावरील सोनंद गांवाजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या जीपचा टायर फुटून पलटी झाल्याने ३ महिला मजूर जागीच ठार झाल्या.तर,या अपघातात जीपमधील ९ जण जखमी झाले असून ही घटना शनिवारी सकाळी सांगोला ते जत या मार्गावरील सोनंद गावाजवळ घडली.
शनिवारी सकाळच्या सुमारास बेळगांव जिल्ह्यातील अथणी येथील १४ महिला या पंढरपूर तालुक्यातील पाचेगाव येथील द्राक्ष बागेत काम करण्यासाठी एका खाजगी जीपमधून निघाल्या होत्या.दरम्यान,जत ते सांगोला रोडवर जीपच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील चाकाचे टायर फुटल्याने ही जीप अचानक पलटी झाली.जीप पलटी झाल्यामुळे या जीपमधून प्रवास करणाऱ्या महिला बाहेर फेकल्या गेल्या.त्यामुळे ३ महिलांचा जागीच मृत्यू झाला तर,९ महिला जखमी झाल्या असून दोघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरजला पाठविण्यात आले आहे.मृत व जखमी महिला या बेळगांव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बळोग्री व ममलाद या दोन गावातील असल्याचे समजते.
——————————————————————————