सांगोला :
सांगोला तालुक्यातील बहुचर्चित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन (उजनी उचल पाणी) योजनेस शासन निर्णयाच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून पुर्व मान्यता मिळाली असून येत्या महिन्याभराच्या काळात या योजनेच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या उजनीचे २ टीएमसी उचल पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सांगोला तालुक्यातील वंचित असलेल्या १६ गावातील शेतीच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लागून हा भाग सुजलाम सुफलाम होणार असल्याचे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
युती सरकारच्या काळात १९९७ साली मंजूर झालेली उजनी उपसा सिंचन योजना अनेक वर्षे रखडलेली होती. शिंदे फडणवीस सरकारने दुष्काळी १३ तालुक्यातील रखडलेल्या सिंचन योजना मार्गी लावण्याच्या घेतलेल्या निर्णयापैकी “उजनी उपसा सिंचन योजनेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना,सांगोला” हे नांव देऊन यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मागणी पूर्ण केली.
दरम्यान आमदार शहाजीबापू पाटील यांनी कार्यकारी संचालक,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ,पुणे यांच्याकडे या योजनेस मुख्यमंत्री यांची मान्यता मिळणेबाबत शासनास प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेस पूर्व मान्यता दिल्याचे शासनाचे उपसचिव प्रसाद नार्वेकर यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे या योजनेचा पुढील प्रशासकीय मान्यतेचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर प्रलंबित उजनी उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचीही मदत झाल्याचे आ.शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
————————————————
येत्या १० दिवसात प्रशासकीय मान्यता मिळताच योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल :
आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ता परिवर्तनानंतर “सांगोला तालुक्यातील सिंचन योजनांसह विविध विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही”,हा मला दिलेला शब्द पाळून उजनी २ टीएमसी उचल पाणी योजनेस पूर्व मान्यता दिल्याने मी अत्यंत समाधानी आहे.येत्या १० दिवसात प्रशासकीय मान्यता मिळताच योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. – आमदार शहाजी बापू पाटील
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक